बॉस नाही तर, तुमचा पगार किती वाढवायचा ते AI ठरवणार! अनेक कंपन्यांनी केले धोरणात बदल

भारतामध्ये कर्मचार्यांच्या पगारविषयक प्रणालीमध्ये मोठा बदल होणार आहे. आता कंपन्या पगार ठरवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करण्याच्या तयारीत आहेत. सध्या अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीची प्रक्रिया सुरु आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल होणार आहे. पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये कंपन्या पगार ठरवण्यासाठी AI आधारित प्रेडिक्टर मॉडेल्सचा वापर करणार आहेत. EY या संस्थेच्या ‘Future of Pay 2025’ रिपोर्टनुसार, 10 पैकी 6 कंपन्या AI चा वापर वेतन आणि इन्सेंटिव्ह ठरवण्यासाठी करू इच्छितात. पगाराबरोबरच, रिअल-टाइम पे इक्विटी अॅनालिसिस आणि कस्टमाइज्ड बेनिफिट्स ठरवण्यासाठीही कंपन्या AI तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात.