AI मुळे वाचले सरकारचे तब्बल 1045 कोटी रु.

मुंबई, दि. १७ : AI चा योग्य प्रकारे वापर केल्यास आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत. अशा एका प्रकरणात AI मुळे सरकारचे 1 हजार 45 कोटी रु वाचले आहेत. कॅन्सर आणि किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांचा खोटा दावा करून इन्कम टॅक्स विभागाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. देशभरात तब्बल 4 हजार टॅक्सपेयर्सनी रिटर्नमध्ये खोटा मेडिकल बनाव करून टॅक्स सवलत मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या मोहिमेमुळे सरकारचे 1 हजार 45 कोटी रुपयांचे रिटर्न रोखण्यात यश आलं आहे, अशी माहिती इन्कम टॅक्स विभागाने दिली आहे. आगामी काळात फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र होणार, अशी माहिती आयकर आयुक्त व्ही. रजिता यांनी दिली आहे.
इन्कम टॅक्स विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने रिटर्न्सची सखोल छाननी केली असता हा प्रकार उघडकीस आला. कलम 80DDB नुसार ‘टर्मिनल इलनेस’ म्हणजे बरे न होणारे गंभीर आजार झाल्यास कर सवलत दिली जाते. ही सवलत रुग्णाच्या कुटुंबीयांनाही लागू होते, आणि त्याचाच गैरफायदा घेत खोटे दावे करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातून सर्वाधिक बनावट रिटर्न्स आढळले असून, विशेष म्हणजे हे सर्व रिटर्न्स एकाच ई-मेल आयडीवरून भरले गेले होते.
SL/ML/SL