AI चा दुरूपयोग टाळण्यासाठी जागतिक नियमावली तयार करणार’, पंतप्रधान मोदींची घोषणा

 AI चा दुरूपयोग टाळण्यासाठी जागतिक नियमावली तयार करणार’, पंतप्रधान मोदींची घोषणा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) या खासगी कार्यक्रमासाठी जियो वर्ल्ड कनव्हेन्शन सेंटर येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारताने फिनटेक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. भारतीय बँकिंग व्यवस्था आता नेटबँकिंग आणि ॲपच्या माध्यमातून २४ तास सुरू असते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आता डिजिटल व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी सायबर घोटाळ्यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न करू. तसेच जगभरात एआयचा गैरवापर होत आहे. हा दुरूपयोग रोखण्यासाठी जागतिक स्तरावर नियमावली तयार करण्याचे आवाहन मी केले आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

PGB/ML/PGB
30 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *