पुण्यश्लोक “अहिल्यादेवींवर” नर्मदेचा जलाभिषेक

 पुण्यश्लोक “अहिल्यादेवींवर” नर्मदेचा जलाभिषेक

ठाणे, दि. ३१ :– देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. आहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तीर्थ पाठविण्यात आले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तिर्थाने अभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तिर्थ पाठविण्यात आले होते. राज्यात सांगली, पुणे,माळेगाव बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे,औंढा नागनाथ, अंबड आदी ठिकाणी हे तीर्थ पोहचले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनश्चर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडुन युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तिर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी झाली.

ठाण्यातील मासुंदा तलाव येथे आहिल्यादेवीच्या मूर्तीवर शनिवारी सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कवितके व सौ काजल कवितके यांच्या हस्ते नर्मदा तीर्थानने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महावितरणचे संचालक मुरहरी केळे, डॉ अशोक माने,समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे शिवसेना उपविभाप्रमुख राजेंद्र देसाई,वकील नानासाहेब मोटे, पंढरीनाथ चोरमले, उद्योजक सुरेश शिंगाडे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, उपायुक्त गोदापुरे, जनसंपर्क अधिकारी रोशना मंचेकर,ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या.

हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव तुषार धायगुडे ,खजिनदार अनिल जरग,उपाध्यक्ष कुमार पळसे,राजेश वीरकर,प्रचारप्रमुख सचिन बुधे,उपखजिनदार सुरेश भांड,सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर,मनोहर वीरकर,प्रसाद वारे,कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,अविनाश लबडे,राजेश वारे,दीपक झाडे,संतोष बुधे,संतोष दगडे,उत्तम यमगर,अंकुश उघाडे,प्रमोद वाघमोडे,उद्धव गावडे,महेश पळसे,अनिकेत पाडसे,आर्यन गुंड, साई बुधे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता खटावकर,सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,उपसचिव सुजाता भांड,उपखजिनदार सुषमा बुधे,सल्लगार मीना कवितके,सदस्य शीतल डफळ,वंदना वारे,अमृता बुधे,सीमा कुरकुंडे,मनीषा शेळके,रंजना यमगर,स्मिता गावडे,शुभांगी उघाडे,रिचा कुलाळ,सुजाता बुधे आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *