आगरीपाडा येथील मिलिंद नगरचा रहिवासी संभ्रमात.

मुंबई, दि ११
“मुंबईतील मिलिंद नगर टॅक पखाडी रोड, आग्रीपाडा येथील सफाई कर्मचारी वसाहतीचे आश्रय योजनेंतर्गत बृहन्मुंबई महनगरपालिकेमार्फत पुर्नविकासाचे काम सन 2021 पासून सुरु आहे. सदर कामे अत्यंत धिम्या गतीने सुरु असून गेल्या 2-3 वर्षापासून पुर्नविकासाचे काम पुर्णपणे थांबलेली आहेत. सदर पुर्नविकासाचे काम का थांबवले ? याबाबत कोणतीच माहिती सफाई कामगारांना देण्यात आलेली नाही, त्यामुळे ते संभ्रमात आहेत. सदर वसाहतीत 74 सदनिकेतील घनकचरा विभागातील सफाई कामगार असून ते याठिकाणी ते पिढ्यांन-पिढ्या वास्तव्य करीत आहेत. सदर ठिकाणी असलेल्या सफाई कर्मचा-यांच्या सेवा निवासस्थानांचे पुर्नविकास करताना त्यांना त्याच ठिकाणी निवासस्थाने उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. तथापी अद्यापपपर्यत महापालिकेकडून सफाई कामगारांना निवासस्थाने देण्यात देण्यात आलेली नाहीत. पुर्नविकासाच्या कामांना गती देऊन तातडीने पुर्नविकास करण्याची मागणी भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ यांचेकडून मुंबईचे पालकमंत्री, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), कार्यकारी अभियंता, उपायुक्त इत्यांदीकडे फेब्रुवारी, 2024 मध्ये लेखी निवेदनाव्दारे करण्यात आलेली आहे. तथापि एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप उक्त प्रकरणी कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सफाई कामगारांच्यात नैराश्याचे वातावरण पसरलेले आहे. शासनाने सदर प्रकरणी तातडीने चौकशी करुन पुर्नविकासाचे संथ गतीने काम करणा-या ठेकेदार कंपनीवर तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तसेच बृहन्मुंबई महनगरपालिका सफाई कामगारांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने सदर पुर्नविकासाचे काम त्वरीत पूर्ण करावीत आणि सफाई कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी औचित्याच्या मुद्दाव्दारे आमदार मनोज जामसूतकर यांनी शासनास विनंती केली.KK/ML/MS