पहिल्याच मुसळधार पावसात शेती गेली खरडून
![पहिल्याच मुसळधार पावसात शेती गेली खरडून](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2024/06/Screenshot-2024-06-15-181428-850x560.png)
पहिल्याच मुसळधार पावसात शेती गेली खरडून
वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सायंकाळच्या सुमारास वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे शेलगांव येथील गजानन घुगे या शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसले आहे. ब्रम्हा पांदण रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे पावसाच्या पुराचे पाणी तुंबुन गजानन घुगे यांच्या शेतात शिरल्याने शेतातील माती खरडून गेली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर माती खरडून गेल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. सदर नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून पांदन रस्त्यात तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Agriculture was wiped out in the first heavy rain
ML/ML/PGB
15 Jun 2024