कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टांगती तलवार कायम…

नाशिक दि १– अल्प उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना न्यायालयाने २ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानसुसार या प्रकरणात कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटेंनी सत्र न्यायालयात अपील केले होते.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेप्रकरणी स्थगिती मिळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. तर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला होता. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षे प्रकरणी आज निकाल येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता या प्रकरणात पुढील सुनावणी ५ मार्च रोजी होणार आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये, या मागणीसाठी अंजली दिघोळे यांनी याआधी हस्तक्षेप अर्ज दाखल होता. यानंतर शरद शिंदे यांनी देखील हस्तक्षेप अर्ज दाखल केला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या प्रकरणी दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतले. हस्तक्षेप याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता या प्रकरणी ५ मार्च रोजी सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत ज्यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केलाय त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास वेळ देण्यात आला आहे.