पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा धाराशिव दौरा
धाराशिव, दि.२५ : “कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, शेवटच्या स्तरातील नागरिकांपर्यंत पक्षाचे विचार व पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत झालेली कामे पोहचवावीत. पक्षाकडे निवडणुका लढविण्यासाठी सक्षम उमेदवारांची संख्या मोठी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढण्यास तयार आहे”, असे मत कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केले आहे. धाराशिव येथे आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. “महायुती झाली तर वरिष्ठांचा आदेश पाळू, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत,” महायुती विषयीही अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. आज पदाधिकारी मेळावा व संवाद कार्यक्रमादरम्यान पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींची निवडणूक स्वबळावर लढविण्याची जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी व पदाधि-यांनी केली. यावेळी, संघटनात्मक बांधणी, संघटन रचनेचा आढावा, स्थानिक समस्या आणि निवडणुकीसाठी रणनीती यावर चर्चा केली. तसेच, तालुका, शहर आणि ग्रामीण स्तरावर संघटन रचना मजबूत करून सर्व विभागांत सक्रिय संपर्क, संवाद आणि सदस्य नोंदणी मोहीम वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
कार्यकर्त्यांच्या मागणीला दुजोरा देत मंत्री भरणे म्हणाले, “आमच्या पक्षातील कार्यकर्ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वतंत्र लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणुकांसाठी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत.” महायुतीमधील जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सावध पवित्रा घेतला. “जर महायुती झाली, तर वरिष्ठ नेते जो आदेश देतील, त्याचं आम्ही पालन करू. पण तसे न झाल्यास, आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत,” असेही दत्ता मामा भरणे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना श्री. भरणे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विचार, कार्य आणि विश्वास यांच्या आधारे उभा आहे. जनतेचा पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास हा पक्षाच्या बळाचे मूळ आहे, आणि तो टिकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात, आपल्या परिसरात सक्रिय राहणे आवश्यक आहे. शेतकरी, युवक, महिला आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींना अधिक सक्रीय सहभागासाठी प्रोत्साहित करा. पक्षाची ताकद कार्यकर्त्यांच्या एकतेत आहे आणि ती एकता आज धाराशिव जिल्ह्यात स्पष्टपणे दिसते आहे. त्यामुळे, आगामी नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने एकजुटीने लढलं पाहिजे. जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विश्वास पुन्हा दृढ झाला पाहिजे असं काम करा. कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन पक्षाचे विचार, काम आणि विकासाची दिशा पोहोचवण्याची गरज आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. पण कमी वेळेत अधीक यश संपादन करायचं असेल तर प्रत्येकानं मेहनत करणं आवशक आहे.” श्री. भरणेंनी जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवरील संघटन रचना पुन्हा सक्षम करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले, तसेच नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचं आवाहन केलं.
या बैठकीत आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुलभैय्या मोटे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका धुरगुडे, गोकुळ तात्या शिंदे, खलील पठाण, अतुल जगताप, मोहनराव मुंडे, सर्व सेलचे अध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, शहर व ग्रामीण विभागातील पदाधिकारी, महिला व युवक आघाडीचे प्रतिनिधी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

ML/ML/SL