राहुरी कृषि विद्यापीठाचा आयआयटी कानपूर सोबत सामंजस्य करार
अहमदनगर, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, Mahatma Phule Agricultural School राहुरी आणि गंगानदी खोरे व्यवस्थापन अभ्यास केंद्र, आयआयटी कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शक तत्वे आणि धोरणे या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नवी दिल्ली येथे नुकतेच करण्यात आले होते.Agricultural University and IIT Kanpur
या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक डॉ. अशोक शर्मा हे होते.
यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, आयआयटी कानपूर येथील ई गंगा केंद्राचे संस्थापक डॉ. विनोद उपस्थित होते. यावेळी डॉ. अशोक शर्मा मार्गदर्शन करतांना म्हणाले की शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोन म्हणून पाहिल्यास समाजातील आर्थिक आणि सामाजिक समस्या दूर होण्यास मदत होईल म्हणून शेतीमध्ये विविधीकरण घडवून आणणे गरजेचे आहे. याप्रसंगी डॉ. किरण कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद रसाळ यांनी विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण आणि विस्तार या विषयाचा आढावा दिला.
या कार्यशाळेत तज्ञांनी पारंपारिक शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, आधुनिक विज्ञान व उच्च तंत्रज्ञान शेतीविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ,Mahatma Phule Agricultural School राहुरी आणि आयआयटी कानपूर सोबत कृषि महाविद्यालय, पुणे येथे सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
या सामंजस्य करारामुळे स्थापन होणार्या सेंटरचा फायदा शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच उद्योजक यांची क्षमता वाढविणे आणि विपणनासाठी मदत करणे याचबरोबर शाश्वत आणि प्रगत अशा कृषि पायाभुत सुविधा विकसीत करण्यासाठी होणार आहे. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे व सामंजस्य कराराचे समन्वयक म्हणून कास्ट प्रकल्पाचे सर्व संशोधन सहयोगी यांनी काम पाहिले.
ML/KA/PGB
7 July 2022