दावोसमध्ये गुंतवणुकीचा श्रीगणेशा, लाखों कोटींचे करार
दावोस, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वित्झर्लंडच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीतून महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील उद्योग गुंतवणुकीचा श्री गणेशा झाला असून पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे. त्यानुसार कल्याणी उद्योग समूह गडचिरोलीत तब्बल ५ हजार २०० कोटींची गुंतवणूक करून मोठा पोलाद प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून सुमारे ४ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या हरित परिवर्तनासाठी जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत ३ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करारही करण्यात आला आहे.
कल्याणी उद्योग समूहाने महाराष्ट्र सरकारसोबत पोलाद आणि संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी हा करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कल्याणी उद्योग समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. हरित ऊर्जा, इलेक्ट्रिकल वाहन, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर दोघांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासासाठी क्लॉस श्वाब यांनी शुभेच्छा दिल्या. दावोसमध्ये पुढील दोन दिवस भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पॅव्हेलियन अगदी सज्ज झाले आहे.
महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणुकीचे सामंजस्य करार होऊ घातले असून विविध कंपन्यांसोबत बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालकही आहेत. आगामी काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्याबाबत फ्रँक जर्गन रिक्टर यांनी यावेळी स्वारस्य दाखविले. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने नवीन तंत्रज्ञानासह नाविन्यपूर्ण आयोजन करण्यावर त्यांनी भर दिला. होरॅसिसचे मुख्यालय मुंबईत सुरू करण्याबाबत यावेळी प्राथमिक चर्चा झाली.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी X या सोशल मिडिया अकाऊंटवर लिहिले आहे की,
महाराष्ट्राच्या हरित परिवर्तनासाठी जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत ३ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करार!
महाराष्ट्र सरकार आणि जेएसडब्ल्यू ग्रुप यांच्यात ३,००,००० कोटी रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करार झाल्याचे पाहून खूप आनंद झाला, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली आणि नागपूर या भागात १०,००० लोकांना रोजगार मिळेल!
दावोस येथील या ऐतिहासिक क्षणाचा भाग असल्याबद्दल सज्जन जिंदाल जी यांचे खूप खूप आभार, ज्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक वातावरणाला मोठी चालना मिळेल.
या गुंतवणुकीचे क्षेत्र जसे की अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयन बॅटरी आणि सौर मॉड्यूल आमच्या ‘ग्रीन महाराष्ट्र’ मोहिमेत मोठी भूमिका बजावतील!
*(टीप : ही यादी भारतीय वेळेनुसार सायं. 8.30 पर्यंत)**आतापर्यंत झालेले सामंजस्य करार*
*एकूण : 4,99,321 कोटींचे*
1) कल्याणी समूहक्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्हीगुंतवणूक : 5200 कोटीरोजगार : 4000कोणत्या भागात : गडचिरोली
2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.क्षेत्र : संरक्षणगुंतवणूक : 16,500 कोटीरोजगार : 2450कोणत्या भागात : रत्नागिरी
3) बालासोर अलॉय लि.क्षेत्र : स्टील आणि मेटल्सगुंतवणूक : 17,000 कोटीरोजगार : 32004) 4)विराज प्रोफाईल्स प्रा. लि.क्षेत्र : स्टील आणि मेटल्सगुंतवणूक : 12,000 कोटीरोजगार : 3500कोणत्या भागात : पालघर
5) एबी इनबेवक्षेत्र : अन्न आणि पेयेगुंतवणूक : 750 कोटीरोजगार : 35कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
6) जेएसडब्ल्यू समूहक्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्सगुंतवणूक : 3,00,000 कोटीरोजगार : 10,000कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली
7) वारी एनर्जीक्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणेगुंतवणूक : 30,000 कोटीरोजगार : 7500कोणत्या भागात : नागपूर8) टेम्बोक्षेत्र : संरक्षणगुंतवणूक : 1000 कोटी रोजगार : 300कोणत्या भागात : रायगड
9) एल माँटक्षेत्र : पायाभूत सुविधागुंतवणूक : 2000 कोटीरोजगार : 5000कोणत्या भागात : पुणे
10) ब्लॅकस्टोनक्षेत्र : माहिती तंत्रज्ञानगुंतवणूक : 25,000 कोटीरोजगार : 1000कोणत्या भागात : एमएमआर
11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटीक्षेत्र : डेटा सेंटर्सगुंतवणूक : 25,000 कोटीरोजगार : 500कोणत्या भागात : एमएमआर
12) अवनी पॉवर बॅटरिजक्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्सगुंतवणूक : 10,521 कोटीरोजगार : 5000कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
13) जेन्सोलक्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्सगुंतवणूक : 4000 कोटीरोजगार : 500कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
14) बिसलरी इंटरनॅशनलक्षेत्र : अन्न आणि पेयेगुंतवणूक : 250 कोटीरोजगार : 600कोणत्या भागात : एमएमआर
15) एच टू ई पॉवरक्षेत्र : हरित ऊर्जागुंतवणूक : 10,750 कोटीरोजगार : 1850कोणत्या भागात : पुणे
16) झेड आर टू समूहक्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्सगुंतवणूक : 17,500 कोटीरोजगार : 23,000
17) ब्ल्यू एनर्जी मोटर्सक्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्हीगुंतवणूक : 3500 कोटीरोजगार : 4000कोणत्या भागात : पुणे
18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)क्षेत्र : हरित ऊर्जागुंतवणूक : 8000 कोटीरोजगार : 2000
19) बुक माय शोक्षेत्र : करमणूकगुंतवणूक : 1700 कोटीरोजगार : 500कोणत्या भागात : एमएमआर
20) वेल्स्पूनक्षेत्र : लॉजिस्टीक गुंतवणूक : 8500 कोटीरोजगार : 17,300
ML/ ML/ SL
21 Jan 2025