कुस्ती खेळाडूंना सक्षम करण्यासाठी जपानमधील संघटनेबरोबर करार
मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कुस्ती खेळाडूंना तांत्रिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी राज्यातील कुस्ती खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आँलंम्पिक सारख्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदकांची संख्या वाढविण्यासाठी कुस्ती या खेळातील तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्यासाठी सामंजस्य कराराची मदत होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
येथील सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य करारा प्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, आमदार मेघना बोर्डीकर- साकोरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त डॉ. सुहास दिवसे, वाकायामा राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष वातारू किमुरा, वाकायमाचे आमदार तानेगुची तसेच मान्यवर उपस्थित होते.
करार कशासाठी
मंत्री महाजन म्हणाले,या करारामुळे महाराष्ट्र व वाकायामा या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना परस्परांच्या देशात जाऊन एकत्र सराव, तंत्रांची देवाणघेवाण करणे सुलभ होणार असून प्रशिक्षकांनाही सहकार्य करून खेळाडूंना नवनवीन तंत्रे शिकवणे शक्य होणार आहे. खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी याचा उपयोग होणार असून खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे.
पुणेस्थित असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ जपान ( AFJ) या संस्थेच्या समन्वयाने हा करार साध्य झाला आहे. AFJ ही संस्था गेली ३२ वर्ष भारत व जपान या दोन देशांचे विविध क्षेत्रांतील संबंध दृढ करण्यासाठी झटत आहे.
Agreement with organization in Japan to empower wrestlers
करारामागची पार्श्वभूमी
कुस्ती तथा मल्ल विद्येला मोठा इतिहास आहे. वैदीक काळापासून हा खेळ खेळला जातो. महाभारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगांमध्ये आढळतो. भारताला जी 20 गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व जपान या दोन जी २० समुहातील देशातील दोन राज्यांमध्ये होणारा करार हा अंतरसहाय्यक वाढवण्यात ठरेल असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.
महाजन म्हणाले बदलत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीविषयक आयाम बरेच बदलले असून त्याअनुषंगाने राज्यातील कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धामध्ये पदके मिळविता यावीत यासाठी आज राज्य शासन आणि वाकायामा स्टेट, जपान येथील वाकायामा प्रीफेक्चर कुस्ती महासंघ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याचेही सांगितले.
वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो,या कराराच्या निमित्ताने राज्यात जास्तीत जास्त पदक विजेते कुस्तीपटू चढावेत अशा सदीच्छा व्यक्त केल्या आणि जपान बरोबर इतरही क्षेत्रात मैत्रीचे संबंध यामुळे दृढ होतील असे सांगितले.
ML/KA/SL
3 Feb. 2023