एकरकमी एफ आर पी साठी आंदोलन सुरू

 एकरकमी एफ आर पी साठी आंदोलन सुरू

सांगली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात उदगिरी आणि क्रांती साखर कारखान्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज धडक मारली. ऊस वाहतूक करणारा ट्रॅकटर रोखून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.Agitation started for lump sum FRP

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलनाची हाक दिली होती. काही ठिकाणी ऊसतोड सुरू असल्याने ऊसतोड बंद करण्यात आली. यावेळी खानापूर तालुक्यातील उदगिरी आणि पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धडक दिली. कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला. ऊस वाहतूक आढळून आल्यास पेटवून देऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे Mahesh Kharade यांनी दिला.

एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन झाले पाहिजेत, रिकव्हरीतील चोरी थांबली पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत आदींसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानीने आंदोलन पुकारले होते.

ML/KA/PGB
18 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *