लासलगाव समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन
नाशिक, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावल्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत कांद्याचे दर ४ हजार रुपयांवरून १ हजार रुपयांच्या आता आल्याने संतप्त शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली असून नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पडत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यादरम्यान बाजार समितीच्या आवारातच ठिय्या मांडल्याने दीड तास कांद्याचे लिलाव बंद पडले होते. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी कांद्याची निर्यातबंदी तात्काळ हटवावी, कांदा निर्यात बंदी दरम्यान शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटलला दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केली. Agitation of Onion Producers in Lasalgaon Samiti
ML/KA/PGB
29 Jan 2024