महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीचे आझाद मैदानात आंदोलन

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा ” या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.
२३ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी असा दर्जा तात्काळ लागू करावा. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तात्काळ मंजूर करावी तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित घरभाडे व वाहतूक भत्ता लागू करावा तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाची थकबाकी त्वरित मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
समितीचे अध्यक्ष अरुण निरभवणे, कर्मचारी सहकारी पतपेढीचे संचालक अभिमन्यू डोळसे कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे,सरचिटणीस , साधना भगत आदी मान्यवर उपस्थित होते. Agitation of Maharashtra Life Authority Committee in Azad Maidan

ML/KA/PGB
28 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *