ओबीसी समाज आक्रमक, नांदेड ते नागपूर महामार्ग रोखला
नांदेड, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा मागणीसाठी नांदेड मध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला होता , त्यासाठी नांदेड ते नागपूर महार्गावर ओबीसी समाजाने आज रस्तारोको आंदोलन केले.
हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे हे आंदोलन करण्यात आले तब्बल एक तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला होता.
हदगाव तालुक्यातील कवणा या गावी दत्तात्रय आनंतवार यांनी याच मागणी साठी मागील सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. पण या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही.परिणामी ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आज रास्ता रोको आंदोलन केले.
या रास्ता रोको आंदोलनाला ओबीसी समाजातून मोठा पाठिंबा मिळाला असून तब्बल एक तास हा रास्ता रोको करण्यात आल्याने नांदेड ते नागपूर जाणाऱ्या महामार्गावर जड वाहनासह इतर वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
या रास्ता रोको आंदोलनामध्ये ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले असून ओबीसी समाज एकवटल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
ML/ML/SL
27 July 2024