पिग्मी एजंटची मुलगी झाली दिवाणी न्यायाधीश…

बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जे एम एफ सी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला असून बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या 10 गुणवंतांमध्ये नऊ मुलींचा समावेश आहे.
ही परीक्षा 2022 ची परीक्षा लांबणीवर पडली होती कोरोना नंतर 9 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण परीक्षा झाली होती. 24 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यातील 343 उमेदवारांची मुलाखती साठी निवड झाली, 17 ते 29 मार्च 2025 या काळात मुलाखती पार पडल्या. शनिवारी अंतिम निकाल जाहीर झाला असून 114 जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी निवड करण्यात आली आहे.
पहिल्या 10 टॉपर्स मध्ये नऊ मुली असून हे या निकालाचे वैशिष्ट्य आहे.पहिल्या दहा टॉपर्स मध्ये नऊ मुली असून बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळविले. ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली आली आहे.
ऋचा कुलकर्णी चे वडील हे पिग्मी एजंट म्हणून गेली 35 वर्षापासून पूर्णवादी बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करतात 100 रुपयाला 2 % कमिशन त्यांना मिळतं त्यातूनच आपली उपजीविका विठ्ठल कुलकर्णी हे भागवतात. याबाबत बोलताना ऋचा हिने सांगितले की,
आपण पस्तीस वर्षापासून पिग्मी एजंट म्हणून काम करतो एक एक दोन दोन रुपये या ठिकाणी गोळा करतो. आतापर्यंत केलेल्या कष्टाचा चीज झालं माझ्या मुलीनं माझ्या कष्टाचा चीज केलं. अशी भावना वडिलांनी व्यक्त केली. मुलगी न्यायाधीश झाली हे सांगताना आईला अश्रू अनावर झाले आम्ही अनेक ठिकाणी नोकरी केल्या आणि काम केली मात्र चांगली काम केली कुणालाही धोका दिला नाही त्यामुळे त्या कामाचं चीज या ठिकाणी झाल्याच्या पाहायला मिळते आणि जे काम माझ्या मुलीने केले ते सर्व मुलींनी करावं चांगलं राहावं असं देखील ऋचाच्या आईने म्हटलं आहे.
ML/ML/PGB
6 April 2025