साडेतीन वर्षानंतर महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्वती टेकडीवर साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या खुनाचा छडा लावण्यास पर्वती पोलिसांना अखेर यश आले आहे. २०२० मध्ये आर्थिक वादातून महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
१७ ऑगस्ट २०२० रोजी पर्वती टेकडीवरून तळजाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. याबाबत पर्वती पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मात्र महिलेची ओळख पटली नसल्याने तपासात अडचणी येत होत्या.
मृत महिलेच्या हातावर सुरेखा असे नाव गोंदलेले होते. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी ऑगस्ट २०२० मध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती घेतली. यामध्ये रोहन चव्हाण याने खेड शिवापूर पोलिस चौकीत त्याची आई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविल्याचे समोर आले.After three and a half years, the mystery of the woman’s murder was revealed
ML/KA/PGB
24 Dec 2023