‘लाडली बहेना ‘च्या यशांनंतर आता महाराष्टात ‘लेक लाडकी’….

 ‘लाडली बहेना ‘च्या यशांनंतर आता महाराष्टात ‘लेक लाडकी’….

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या ‘लाडली बहना’ योजनेने भाजपला मोठा फायदा देत सत्ता मिळवून दिली त्यामुळे महाराष्ट्रात लेक लाडकी योजना अधिक जोमाने लागू करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.

मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी या योजनेद्वारे १ कोटी ३१ लाख गरीब महिलांच्या बँक खात्यात दरमहा १२५० रुपये देण्यास सुरुवात केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तेथील सर्वच मतदारसंघांत महिलांनी भाजपला भरघोस मतदान केले. ३४ मतदारसंघांत तर महिलांच्या मतांचे प्रमाण तर पुरुषांपेक्षा जास्त होते त्याचा फायदा पुन्हा भाजपा सरकार येण्यात झाला असे मानले जाते. आता या विजयानंतर महाराष्ट्रात ही जानेवारीपासून ‘लेक लाडकी योजना’ सुरू होणार असून त्यासाठी उद्या पासून सुरू होणाऱ्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात 125 कोटी रुपयांची तरतूद पूरवणी मागण्यांमधून केली जाणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

राज्यातील सुमारे अडीच कोटी कुटुंबाना याचा फायदा होणार आहे असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.ही योजना 9 महिन्यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती मात्र अर्थसंकल्पात तरतूदच नसल्याने तिची अमलबजावणी होऊ शकली नव्हती.आता मध्य प्रदेशातील भाजपाच्या यशाने राज्यातील महायुती सरकारलाही जाग आली आहे.

योजना अशी असेल

मुलगी जन्माला आल्यास राज्य सरकारकडून 5,000 रुपयांची मदत दिली जाईल. यानंतर मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर तिला पहिल्या वर्गात 4 हजार रुपये सरकारकडून दिले जातील. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला 6,000 रुपयांची सरकारी मदत मिळेल. अकरावीला आठ हजार रुपये दिले जातील.

मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला राज्य सरकारकडून 75 हजार रुपये दिले जातील. अशा प्रकारे मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे याच धर्तीवर आपल्या राज्यात आता ही योजना राबविली जाणार आहे. After the success of ‘Ladli bahena’ comes Maharashtra’s ‘Lake Ladki’….

ML/KA/PGB
6 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *