विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेनंतर सर्व राजोपचार पूर्ववत

 विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेनंतर सर्व राजोपचार पूर्ववत

पंढरपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कार्तिक एकादशीसाठी For Kartik Ekadashi 24 तास भाविकांना दर्शन देणाऱ्या विठुरायाचा शिणवटा आजच्या प्रक्षाळपूजेने विरला गेला. रविवारी दुपारी झालेल्या प्रक्षाळ पूजेच्या विधीमध्ये विठ्ठलास गरम पाण्याने स्नान तसेच पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला.After the Purkshaal Pooja of Vitthala, all royal treatments are restored

अभ्यंग स्नानही विठ्ठलास घालण्यात आले यावेळी संपूर्ण मंदिर हे देखील स्वच्छ धुऊन मंदिरास पानाफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. गेल्या 17 दिवसापासून विठ्ठलाचे बंद असणारे राजोपचार आजच्या प्रक्षाळ पूजेनंतर पुन्हा पूर्ववत होणार आहेत. या पूजेच्या निमित्ताने पंढरपूरच्या कार्तिकी वारीची देखील सांगता झाली.

ML/KA/PGB
13 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *