बुलेट ट्रेननंतर मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवतील

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या सरकारला आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची लागली आहे, त्यामुळे ते सारखे दिल्ली ला पळत असतात अशी टीका शिवसेना ऊबाठा चे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
वेदांता फॉक्सकॉन बल्कड्रग पार्क, अगदी वर्ल्ड कप ची फायनल सुद्धा त्यांनी गुजरातला नेली.आता हिरे बाजार सुद्धा गुजरातला नेला, हे काय होते कोणाच्या आदेशाने होते हे सगळ्यांना माहिती आहे असे ते म्हणाले.
आता हे सगळं बुलेट ट्रेन येण्याआधी झालेला आहे. बुलेट ट्रेन काम पूर्ण झाल्यानंतर या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवाव असं वाटेल असे ठाकरे म्हणाले.
जे बीसीसीआय मध्ये बसून मुंबईतली फायनल गुजरातला नेऊ शकतात ते यावर उत्तर देण्याच्या लायकीची आहेत असं मला वाटत नाही. ज्यांना फ्रस्ट्रेशन येते ज्यांना थेरपीची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही ज्यांना पक्षात किंमत नाही त्यांना मी उत्तर देत नाही असे ते म्हणाले.
सिनेट निवडणूक निर्णयावरून हे स्पष्ट झाला आहे की हे सरकार घाबरट आहे. आमच्या ताकदीला हे सरकार घाबरत आहेत.
मागच्या वेळेच्या पदवीधर निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी विजयी झाली.या युनिटच्या दहा जागांवर सुद्धा आम्ही जिंकणार होतो हे त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे या निवडणुका पुढे नेल्या असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
भाजपाच्या कार्यकर्त्यांना माझा प्रश्न आहे, ज्यांनी आंदोलन केली जे पक्षासाठी काम करत आहेत, त्यांनी विचार केला पाहिजे की कॅबिनेटमध्ये 30 पैकी फक्त सहा मंत्री हे मूळ भाजपचे आहेत.महामंडळ कुठेही कोणाला दिली गेली नाहीयेत पुणे पालकमंत्री सुद्धा दुसरीकडे गेलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना नेमकं मिळालं काय ? असा सवाल त्यांनी केला.
ML/KA/SL
27 Oct. 2023