प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठलाचे राजोपचार पुन्हा पूर्ववत…

 प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठलाचे राजोपचार पुन्हा पूर्ववत…

सोलापूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी यात्रेची सांगता आज विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेने झाली. विठ्ठलास आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गरम पाणी , लिंबू साखर यांनी अभिषेक घालण्यात आला. गेल्या १७ दिवसापासून विठ्ठल भक्तांना दर्शन देण्यासाठी अविरतपणे 24 तास उभे आहेत. त्यामुळे विठ्ठलास आलेला शिणवटा दूर करण्यासाठी प्रक्षाळ पूजा केली जाते. यावेळी गरम पाण्याने विठोबास स्नान घालून विधिवत पूजा केली जाते. https://youtu.be/A7GJV193kUk

या पूजेनंतर पांडुरंगाचे राजोपचार पुन्हा पूर्ववत करण्यात आले. यामध्ये आता पुन्हा काकड आरती , पोशाख , शेजारती, धुपारती असे उपचार सुरू होणार आहेत. या पूजेनिमित्त संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवण्यात आले होते.

ML/KA/SL

7 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *