‘छावा’ चित्रपटामधील ‘हे’ दृष्य हटविल्यावर चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करण्याचा एक सीन दाखवण्यात आला आहे. याशिवाय संभाजी महाराजांचं नृत्यही पाहायला मिळतं. या सीनवरुन मोठा वाद झाला. महाराष्ट्रातील राजकारणी आणि शिवप्रेमींनी या सीनला कडाडून विरोध केला. पण अखेर हा वाद आता थांबला असून ‘छावा’मधील तो सीन काढून टाकल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी तो सीन काढून चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले.
ML/ML/PGB 27 Jan 2025