छगन भुजबळांच्या दौऱ्यानंतर आंदोलकांनी शिंपडलं गोमूत्र…

 छगन भुजबळांच्या दौऱ्यानंतर आंदोलकांनी शिंपडलं गोमूत्र…

नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आज नाशिक जिल्ह्यातील येवला आणि निफाड तालुका दौऱ्यावर असून पावसानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना या पाहणी दौऱ्याला मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला. आमचं नुकसान आम्ही बघून घेऊ, तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका, अशा प्रतिक्रिया मराठा समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात येत होत्या.

मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा येवला तालुक्यातील सोमठाण देश आणि निफाड तालुक्यातील लासलगाव कोटमगाव येथे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दाखल होताच, यावेळी गावातील मराठा आंदोलकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला. त्यांच्या ताफ्याला आंदोलकांनी पाठ दाखवून काळे झेंडे दाखवले. गाड्यांचा ताफा जाताना ‘भुजबळ गो बॅक’ अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.

आज भुजबळांचा ताफा येवला शहरातून जाणार असल्यानं शहरातील विंचूर चौफुली इथं सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत भुजबळांच्या येवला दौऱ्याला विरोध केला. यावेळी भुजबळ हे आपल्या येवला संपर्क कार्यालयात निघाले, असताना विंचूर चौफुली इथं आंदोलक असल्यानं भुजबळ यांनी आपला मार्ग बदलत दुसऱ्या मार्गे पाहणी दौऱ्याला निघून गेले. भुजबळांच्या दौऱ्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दौरा आटोपल्यानंतर रस्त्यावर शिंपडलं गोमूत्र

छगन भुजबळ सोमठाण देश गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दौरा आटोपल्यानंतर भुजबळ ज्या रस्त्यानं गेले, त्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. भुजबळ रस्त्यावरुन निघून गेल्यानंतर इथल्या मराठा आंदोलकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडून घोषणाबाजी दिली. तर काही आंदोलकांनी अर्धनग्न होत काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेध केला.

ML/KA/SL

30 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *