तब्बल चाळीस वर्षांनंतर “पुरुष’ नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज
पुणे,दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्त्री पुरुष समानता, स्त्रीची अस्मिता, समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर टीका, सामाजिक स्थितीवर भाष्य हे विषय या केंद्रस्थानी असलेले जयवंत दळवी लिखित ‘पुरुष’ हे नाटक ४० वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या नाटकाने रंगभूमी गाजवली होती.आता मुख्य भूमिकेत शरद पोंक्षे दिसणार आहेत. मात्र, या नाटकाचे केवळ ५० प्रयोग होणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक प्रयोग होणार आहे. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा रंगमंचावर येत आहे.
‘पुरुष’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले असून येत्या १४ डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. राजन ताम्हाणे दिग्दर्शित, जयवंत दळवी लिखित या नाटकात श्रीकांत तटकरे, समिता भरत काणेकर निर्माते आहेत. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाला विजय गवंडे यांचे संगीत लाभले आहे.
SL/ML/SL
1 Dec. 2024