अफ्रिकन गोगलगायीचे संकट; सोयाबीन पिकांचे नुकसान…

लातूर दि १:– शंखी गोगलगायीच्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात सध्या आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव झालाय. आफ्रिकन गोगलगायीमुळे त्यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. महादेव गोमारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यांच्या शेतात दिसून येत आहे यामुळे ते त्रस्त झालेत.
उपाययोजना करूनही प्रादुर्भाव कायम असल्यामुळे ते सध्या चिंतेत आहेत. त्यांच्यासह आजुबाजूच्या जवळपास दहा ते पंधरा एकर क्षेत्रात आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे… या गोगलगायींची वाढणारी संख्या लक्षात घेता याच्या प्रतिबंधासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी गोमारे यांनी केलीय. ML/ML/MS