आफ्रिकेतील काँगोमध्ये झालेल्या बोट अपघातात २५ जणांचा बुडून मृत्यू

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आफ्रिकेतील काँगोमध्ये मोठा बोट अपघात होऊन २५ जणांचा सोमवारी बुडून मृत्यू झाला आहे. फुटबॉल सामना झाल्यानंतर घरी परतणाऱ्या खेळाडूंवर काळाने घाला घातला आहे. दक्षिण पश्चिम कॉंगोमध्ये नदीत नाव बुडाली, त्यामध्ये २५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये काही फुटबॉल खेळाडूंचा समावेश होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत असल्यामुळे काँगोमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे.
ML/ML/PGB 11 Mar 2025