जेवणासोबत चटकदार चटणी
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
(ही पूर्णपणे मी केलेली पाककृती आहे)
ओली हळद
मोठे आवळे
आल्याचा तुकडा
पुदिन्याची पाने (देठासकट)
तिखट मिरच्या (हल्ली तिखट नसलेल्याही मिळतात म्हणून असे लिहिले)
मीठ
अर्धे भांडी पाणी
क्रमवार पाककृती:
ओल्या हळदीचे दोन मोठे तुकडे, आल्याचा एक तुकडा, चार ते पाच मोठे आवळे, पुदिन्याची मुठभर पाने, पाच सहा तिखट मिरच्या व दोन टीस्पून (धन्यवाद साती – दुरुस्तीसाठी) मीठ आणि अर्धे भांडे पाणी मिक्सरमध्ये घालून दोन मिनिटे मिक्सर चालवावा.
अफलातून चटणी तयार!
अत्यंत गुणकारी अशी ही चटणी असून तितकीच स्वादिष्टही आहे.
Aflatun chutney
ML/ML/PGB 21 May 2024