धोनीकडून शिकून निवृत्ती घेण्याचा सल्ला…’ या’ क्रिकेटपटूवर चाहते भडकले

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला आता टीकेचा सामना करावा लागत आहे. विराट दुसऱ्या कसोटीत 7 आणि 11 धावा करून आऊट झाला होता. त्यानंतर आता तिसऱ्या कसोटीतही तो फक्त 3 धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळामुळे त्याचे चाहते संतापले आहेत. त्याला एमएस धोनीकडून शिकून निवृत्ती घेण्याचे सल्लेही नेटकऱ्यांकडून दिले जात आहेत. धोनीने 2014 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती. धोनीच्या कसोटी कारकिर्दीतील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. त्याने या अखेरच्या कसोटीत 11 आणि नाबाद 24 धावा केल्या होत्या. त्याप्रमाणे आता विराटनेही निवृत्ती घ्यावी असा सल्ला विराटचे चाहते त्याला देत आहेत.