पोस्ट झाले अत्याधुनिक – अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु

नवी दिल्ली,दि. 20 : देशाच्या वेगवान डिजिटल प्रवासात मोठी झेप घेत भारतीय पोस्टाने देशभरात ‘अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ सुरू केली आहे. 5 हजार 800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा ‘अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे इंडिया पोस्ट एक जागतिक दर्जाची सार्वजनिक लॉजिस्टिक्स संस्था म्हणून उदयास येईल असे सांगितले आहे. डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर आधारित हा संपूर्णपणे स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे. हे नवीन तंत्रज्ञान इंडिया पोस्टला आधुनिक लॉजिस्टिक्स कंपन्यांप्रमाणेच डिजिटल सेवा पुरवणे शक्य करणार आहे.
असा होईल उपयोग
UPI पेमेंटची सोय: या नवीन तंत्रज्ञानामुळे आता इंडिया पोस्टमध्ये कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना UPI पेमेंट (UPI payments) करता येणार आहे.
ई-कॉमर्सला चालना: यामुळे ई-कॉमर्स क्षेत्राला मोठा फायदा होणार असून, इंडिया पोस्टची सेवा अधिक जलद आणि कार्यक्षम बनेल.
रिअल-टाइम निर्णय: यामुळे रिअल-टाइम निर्णय घेणे शक्य होणार असून, कामकाजाचा खर्च कमी होईल.
डिजिटल बुकिंग ते डिलिव्हरी: हे तंत्रज्ञान बुकिंगपासून डिलिव्हरीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया डिजिटल बनवेल.
डिजीपिन: डिलिव्हरी अधिक अचूक करण्यासाठी 10 अंकी ‘डिजीपिन’ (DIGIPIN) सुविधा देण्यात आली आहे.