ऍड. डॉ. क्षितिजा वानखेडे यांची फोर्ब्सच्या यादीत नोंद

 ऍड. डॉ. क्षितिजा वानखेडे यांची फोर्ब्सच्या यादीत नोंद

वर्धा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २००८ साली नागपूर विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार विजेत्या वर्धा जिल्ह्याच्या ऍड. डॉ. क्षितिजा सुमित वानखेडे यांनी फोर्ब्स लिगल पावरलिस्ट या दोन प्रतिष्ठित श्रेणीमध्ये खटल्याच्या उत्कृष्ट परिणामाच्या भरोवशावर आणि समाजात स्त्रियांसाठी केलेल्या योगदानामुळे स्थान मिळविले आहे. फोर्ब्सने एकाच वर्षी दोन यादीत डॉ.क्षितिजा यांना सूचिबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि सर्वोत्कृष्ट तज्ज्ञ वकील म्हणून त्यांना मान मिळाला आहे.

राष्ट्रीय पातळीवर चौफेर कामगिरी बजावण्याचा मान विदर्भातील डॉ. क्षितीजा यांनी पटकावला आहे. देशातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून नोंद घेण्यात आली आहे. दोन श्रेणीत स्थान मिळविण्याचा बहुमान मिळविणाऱ्या त्या आतापर्यंतच्या एकमेव महिला वकील आहेत. २००७ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून सुद्धा डॉ क्षितिजा वडतकर यांनी बहुमान प्राप्त केला होता. २०२३ मध्ये इंडिया टू डे या प्रख्यात मासिकाने भारतातील पहिल्या आठ उदयोन्मुख महिला म्हणून सन्मानित केले आहे. संविधान आणि मानवाधिकार या विषयात केलेल्या संशोधनाबद्दल नागपूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे.

राज्यातील आर्थिक गुन्हे क्षेत्रातील आघाडीच्या वकिल असून त्या प्रसिध्द लॉ फर्मच्या संस्थापक आहेत. फोर्ब्सच्या यादीत दोन श्रेणीत प्रथम एका महिला वकिलास असे नामांकन मिळाले आहे. त्याबद्दल बोलतांना डॉ. क्षितिजा वानखेडे म्हणाल्या की, १५ वर्षापूर्वी गुणवत्ता तथा पदकांनी भरलेली ब्रिफकेस घेऊन वर्धा वरुन मुंबईला आले. मला त्यावेळी कुणाचा आधार नव्हता मात्र, कायद्याच्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यास प्राधान्य देवून अथक परिश्रमानंतर देशातील सर्वोच्च कायदा कंपनीत उच्च पदावर पोहचल्यानंतर स्वत:ची संस्था सूरु करण्याचा निर्णय घेतला होतकरु वकिलांना संधी देण्यासोबतच महिला तसेच वंचित घटकास त्यांचे सामाजिक हक्क मिळवून देण्याचे त्यांचे धोरण आहे.

असंख्य अशी प्रकरणे यशस्वी खटले सोडविण्यात यश मिळाले, त्यामुळेच महिला तथा मानवी हक्क याला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. नामांकित विधी संस्थामध्ये, राष्ट्रीय कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करण्यासोबतच पहिल्या पिढीतील वकिलांना त्यांनी एक उद्योजक म्हणून वागविले आणि त्यांना समान भावना बाळगण्यासाठी प्रोत्साहित केले. संस्थेचे कामकाज एका विशिष्ट उद्देशाने सुरु असल्यामुळे सकारात्मक बदल घडून आणण्यात सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे ऍड.क्षितिजा यांनी सांगितले.

‘फोर्ब्स’ मध्ये सादर केलेल्या माहितीचा कागदोपत्री पुरावा, साक्षीदारांचा तपशील, ज्युरी मंडळी आर्वजून तपासतात म्हणून या प्रकियेत सादर करणार असलेली प्रत्येक बाब प्रामाणिक असावी याकडे ‘फोर्ब्स’ कटाक्षाने लक्ष दिले जाते हा बहुमान कष्टाचे चीज झाल्याचे समाधान देणारा असल्याचे डॉ. क्षितिजा वानखेडे यांनी सांगितले.

ML/ML/SL

25 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *