आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज,यंदा पंढरपुरात स्वच्छतेची वारी

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज,यंदा पंढरपुरात स्वच्छतेची वारी
सोलापूर दि ५ — पंढरपुरात यंदाच्या आषाढी वारीसाठी वीस लाख भाविक येतील. असा प्रशासनाचा अंदाज आहे. एकादशी पूर्वी पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाले आहेत. तर आज शनिवारी संध्याकाळपर्यंत सर्व मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतील. एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज दुपारी पंढरपूर आज दाखल होत आहेत.
आज पंढरपुरात नगर प्रदक्षणामार्ग नामदेव पायरी विठ्ठल मंदिर परिसर हा गर्दीने फुलून गेला आहे. तर मंदिरामध्ये एकादशीच्या निमित्ताने फुलांची आकर्षक सजावट करण्याची तयारी पूर्णत्वाकडे जात आहे.
एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठ प्रशासनाने स्वच्छतेच्या दृष्टीने मोठी तयारी केलेली पाहायला मिळते. पंढरपूर शहर , विठ्ठल मंदिर परिसर , चंद्रभागा वाळवंट यासाठी तब्बल साडे सोळाशे कर्मचारी पालिकेने नियुक्त केले. तर 11 हजार शौचालय पंढरपूर शहरात उपलब्ध करण्यात आली आहेत. 8 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा वारीसाठी आहे. त्यामुळे यंदाची स्वच्छतेची वारी परिपूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून होताना दिसत आहे.
ML