आधार युवा प्रतिष्ठानने दिला आदिवासी शाळेला आधार

मुंबई, दि ६
मुंबईतील लालबाग विभागात कार्यरत असणाऱ्या आधार युवा प्रतिष्ठान तर्फे पालघर येथील आदिवासी भाग असलेल्या वेलीचा पाडा, शेलटीचा माळ, खडखड, पिंपळपाडा, पोंडारपाडा येथील पाच शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या २०३ विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा पुढे करीत शैक्षणिक साहित्य आणि अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या शैक्षणिक साहित्यात शाळेचे दप्तर, वह्या कंपोस बॉक्स, चित्रकला वही, रंगीत खडू, पेन, पेन्सिल बॉक्स, छोटी फुटपट्टी, पाण्याची बॉटल, अंकलिपी मराठी आणि इंग्रजी, खेळाचे साहित्य, सतरंजी, मेडिकल प्रथोमपचार किट,
आवश्यक वस्तू सेट ज्यात टूथपेस्ट, टुथब्रश, आंघोळीचा साबण, कपड्याचा साबण, पॅराशूट तेल, पाँ पावडर, रुमाल, शौचालय स्वच्छतेचे साहित्य, बिस्किट्स आणि चॉकलेट्स आदी वस्तू देण्यात आल्या. आम्ही नेहमीच समाजात चांगले कार्य रुजवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी या हेतूने आम्ही या शाळेपयोगी साहित्य वाटप केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे पदाधिकारी विशाल येवले यांनी दिली. KK/ML/MS