पेसा साठी आदिवासींचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन, 

 पेसा साठी आदिवासींचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन, 

चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे गेल्या 24 तासांपासून आदिवासी आंदोलक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. काल आदिवासी समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी व पोंभूर्णा तालुका कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता.

आंदोलकांनी या तालुका स्थळाचा मुख्य मार्ग 24 तासांपासून रोखून धरल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी दखल देत आपल्या मागण्या मान्य कराव्या असे आंदोलकांचे मत आहे.

ज्या गावांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आदिवासी लोकसंख्या आहे, त्या गावांना पेसा गावांचा दर्जा देण्याच्या मागणीसह विविध मागण्या आंदोलकांनी पुढे केल्या आहेत. पोलिसांनी या आंदोलकांना दूर सारण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला आहे. परिणामी काल तळतळते ऊन झेलत आणि रात्री स्वतःची आणलेली शिदोरी खात आदिवासी आंदोलकांनी वन्यजीवांची भीती व कुडकुडत्या थंडीतही रात्र काढली.

आज सकाळी पुन्हा एकदा आंदोलन आपल्या निर्धारावर ठाम दिसले. प्रशासनाने आदिवासी समाजाच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या असा रेटा आंदोलकांनी लावला आहे. Adivasis protest on the streets for Pesa,

ML/KA/PGB
19 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *