आदिवासी विद्यार्थिनी नी बनवल्या जवानांसाठी राख्या

 आदिवासी विद्यार्थिनी नी बनवल्या जवानांसाठी राख्या

बीड , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सुरुडी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा च्या विद्यार्थिननींनी रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने राख्या तयार करून त्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठवल्या आहेत.या उपक्रमासाठी प्रकल्प अधिकारी पी आर बोकडे यांच्या प्रेरणेने शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थींनीनी देशाचे रक्षण करत असलेल्या जवानांसाठी राख्या बनवल्या. या राख्या अतिशय सुबक आणि सुंदर पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत.यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तसेच देशासाठी सीमेवर रात्रंदिवस ऊन, वारा, पाऊस झेलत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता, देश प्रेमाची भावना तसेच सैनिकांबद्दल आदर निर्माण होतो, असे शाळेचे मुख्याध्यापक राठोड यांनी सांगितले. या उपक्रमासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक केतन काकडे आणि संगीता जाधव यांनी परिश्रम घेतले.

ML/KA/PGB 28 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *