दुर्घटनास्थळी जाऊन आदित्य ठाकरेंनी दिला धीर

अलिबाग, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील इर्षाळ वाडीतील दुर्घटनास्थळी युवासेना अध्यक्ष, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोचून. इथल्या दुर्घटनेबद्दल त्यांनी आताच्या घडीला मदत कार्य महत्त्वाचं कसं घडलं का घडलं याबद्दल विधिमंडळात बोलूच अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे मांडली.Aditya Thackeray gave courage by going to the accident site
यावेळी आदित्य ठाकरेंनी दरड कोसळलेल्या दुर्घटनास्थळी जाऊन दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना धीर दिला.स्थानिकांचा आक्रोश हा हृदयद्रावक आहे. ही घटना एवढी भीषण आहे की, भौगोलिक परिस्थितीमुळे, पावसामुळे अजूनही बचाव कार्यात अडथळा येत आहे.
अशावेळी सरकारी यंत्रणा, स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहेतच. त्यांना यश येऊन इथले गावकरी सुखरूप ह्या संकटातून बाहेर येवोत, ही ईश्वर चरणी प्रार्थना असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
ML/KA/PGB
20 July 2023