आदित्य-L1 ने सेल्फीसह शेअर केली पृथ्वी, चंद्राची छायाचित्रे
![आदित्य-L1 ने सेल्फीसह शेअर केली पृथ्वी, चंद्राची छायाचित्रे](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/09/Aaditya-L1-Selfie-850x560.webp)
श्रीहरीकोटा, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सूर्याच्या अभ्यास करण्याचा कामगिरीवर निघालेला ‘आदित्य एल-1’ हा उपग्रह सध्या पृथ्वीच्या कक्षेत आहे. याठिकाणाहून त्याने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो काढले आहेत. सोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे. इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी आदित्य-L1 वर लावलेल्या कॅमेऱ्यातून घेतलेल्या सेल्फीसह पृथ्वी आणि चंद्राची छायाचित्रे शेअर केली. ही छायाचित्रे 4 सप्टेंबर रोजी घेण्यात आली आहेत. सेल्फीमध्ये VELC आणि SUIT ही दोन उपकरणे आदित्यवर दिसत आहेत.
आदित्य 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C57 च्या XL आवृत्ती रॉकेटचा वापर करून प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणानंतर 63 मिनिटे आणि 19 सेकंदांनी हे यान पृथ्वीच्या 235 किमी x 19,500 किमी कक्षेत ठेवण्यात आले.
प्रक्षेपण झाल्यापासून आदित्यची कक्षा दोनदा वाढवण्यात आली आहे. यासाठी थ्रस्टर्स फायर करण्यात आले. सुमारे 4 महिन्यांनंतर ते 15 लाख किमी अंतरावरील लॅग्रेंज पॉइंट-1 येथे पोहोचेल. या बिंदूवर ग्रहणाचा कोणताही प्रभाव दिसत नाही, त्यामुळे येथून सूर्यावरील संशोधन सहज करता येते.
SL/KA/SL
7 Sept. 2023