अदिती राव हैदरी – सिद्धार्थचे गुपचुप लग्न
बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थबरोबर लग्न केलं. अदितीने इन्स्टाग्रामवर सोमवारी लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद दिला आहे. या दोघांच्या लग्नाची कुठेच चर्चा नव्हती. अदिती-सिद्धार्थचे निवडक मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धतीनुसार पार पडला.या जोडप्याने तेलंगणा वानपर्थी येथील 400 वर्षे जुन्या मंदिरात त्यांचा विवाहसोहळा आयोजित केला होता.