आदिशक्ती मुक्ताई चा अंतर्धान समाधी सोहळा उत्साहात सुरू

जळगाव दि २२– आदिशक्ती मुक्ताबाई ७२८ वा अंतर्धान समाधी सोहळा निमित्त संत मुक्ताबाई मंदिर येथे आज महापुजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक आज मुक्ताईनगर येथे दाखल झाले आहे. वारकरी संप्रदायात मोठी परंपरा या सोहळ्याची आहे. या निमित आदिशक्ती मुक्ताई च्या मंदिरात कीर्तन भजन यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शुभ दिनानिमित्त आदिशक्ती मुक्ताईचे भक्त अजाबराव शेषराव पाटील यांनी 1 किंटल 20 किलो आंब्याची आरास तयार करण्यात आली असून अत्यंत मनमोहक असे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर कडे पालखी रवाना होण्याच्या अगोदर आदिशक्ती मुक्ताई या अंतर्धान पावल्यामुळे हा सोहळा साजरा केला जातो. आजच्या दिवशी अंतर्धान सोहळ्यानिमित्त आदिशक्ती मुक्ताईवर फुलवृष्टी करण्यात आली. मुक्ताईच्या मंदिरात टाळ मृदुंगाचा गजर पाहायला मिळाला असून समाधी सोहळ्याला पंढरपूरच्या विठुरायाच्या पादुका, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ महाराज, त्रंबकेश्वर, रेडा महाराज समाधी आळेफाटा, रुक्मिणीच्या कौढिण्यपूर अशा विविध ठिकाणावरून संतांच्या पादुका या आदिशक्ती अंतर्धान समाधी सोहळा दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.