आदिपुरुष OTT प्लॅटफॉर्म रिलिजसाठी झाला एवढ्या कोटींचा करार

मुंबई, १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच हजारो तिकीटांची विक्री झाल्यामुळे या चित्रपटाने आधीच काही कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्समध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती. आदिपुरुष सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 52 दिवसांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.
निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमशी करार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅमेझॉनने आदिपुरुषच्या निर्मात्यांना जवळपास 250 कोटी रुपये दिले आहेत. भारतात अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स यांच्यात जोराची स्पर्धा आहे. त्यामुळे सिनेमा रिलीज होण्याआधीच निर्मात्यांना खूप फायदा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, आदिपुरुषने आपले म्युझिक, सॅटेलाइट आणि इतर डिजिटल राइट्स विकून तब्बल 432 कोटी रुपये कमावले आहेत.
अभिनेता प्रभास, कृती सेनन आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे प्रमुख भूमिकेत असलेला आदिपुरूष हा सिनेमा संपूर्ण देशात रिलीज होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 16 जूनला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट जवळपास 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.
SL/KA/SL
14 June 2023