आधुनिक तंत्रज्ञानाने मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करून , दोषी कंत्राटदारांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

 आधुनिक तंत्रज्ञानाने मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करून , दोषी कंत्राटदारांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाड, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची भर पावसात पाहणी केली .यासाठी त्यांनी पनवेल पळस्पे येथून पाहणीला सुरुवात केली.

रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिली टेक्नॉलॉजी एम 60 आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम 60 पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत आहे या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे.

त्याचप्रमाणे चौथी पद्धत ब्रिक्स कास्ट एम 60 ही पद्धत, या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे . या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे, हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस आहे. जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.

ML/ML/PGB 26 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *