ताडोबात आणखीन एका गेटची वाढ, शेडगावातून पर्यटन सफारी सुरू

 ताडोबात आणखीन एका गेटची वाढ, शेडगावातून पर्यटन सफारी सुरू

चंद्रपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिमुर वनपरिक्षेत्रा अंतर्गत शेडगाव येथे नव्याने पर्यटन सफारी गेट तयार करण्यात आले आहे. आजपासून या प्रवेशद्वारातून सफारीला सुरुवात झाली आहे. या गेटचे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या हस्ते उद्घाटन पार पाडले. चिमुर खडसंगी या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ आणि इतर वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याने वनविभागाने त्या क्षेत्रात पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

शेडेगाव तसेच शिवापुर बंदर या क्षेत्रातील लोकांना रोजगार उपलब्ध होण्याकरीता , सोबतच पर्यटकांना पर्यटनाची उत्तम संधी उपलब्ध होण्याकरीता चिमुर आणि खडसंगी उपक्षेत्रातील वनक्षेत्रात सफारी रस्ते तयार करण्यात आले. कक्ष क्रमांक 15 मध्ये निरीक्षण कुटी तयार करण्यात आली. वन तसेच वन्यजीव संरक्षणासोबतच लोकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा या उद्देशाने 31 किलोमीटर पर्यटन रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यानेच पर्यटन सफारी होणार आहे. सहा जिप्सीद्वारे परिसरातील, पर्यटकांना सफारी करता येणार आहे . या पर्यटन सफारी गेटमुळे लगतच्या गावातील लोकांना गाईड, जिप्सी ड्रायव्हर तथा जिप्सीला रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. या पर्यटन गेटचे बुकींग ऑफलाई असणार आहे.

ML/ML/SL

6 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *