वाशीम येथील आदर्श गणेश विसर्जन मिरवणूक.

 वाशीम येथील आदर्श गणेश विसर्जन मिरवणूक.

वाशिम, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक महाराष्ट्रातील दीर्घकाळ चालणारी आहे. मिरवणुकीचा प्रारंभ आज सकाळी ९ वा स्थानिक शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकातून मानाच्या गणपतीची पूजा करून करण्यात आला. यावर्षी सुद्धा विसर्जन मिरवणुकीमध्ये वाशिम येथील हेडा परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .

तब्बल ५० हजार भाविकांना बेसन, पोळी, भात आणि मिष्टान्न अशा महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. स्थानिक दिघेवाडी शाळेजवळ मानाच्या गणपतीचे आगमन होताच वाशीम शहराचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी गणपती आरती करून नवैद्य भरविला. यावेळी अशोक हेडा, दिलीप हेडा आणि समस्त हेडा परिवाराच्यावतीने गणेश मंडळावर पुष्पवृष्टी केली.

हेडा परिवाराच्या वतीने मागील १३ वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत हरिद्वार येथील शिवमहिमा नृत्य कलाकारांना पाचारण करण्यात येते. हरिद्वार येथील शिव महिमाच्या कलाकारांनी पारंपरिक नृत्याविष्कार सादर करून मिरवणूक मार्गात भक्तीमय वातावरण तयार केले. Adarsh Ganesha immersion procession at Washim.

ML/KA/PGB
28 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *