अदानींची आता गहू मार्केटमध्ये एन्ट्री

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी आता धान्य विक्री क्षेत्रातही प्रवेश करणार आहेत. अदानी समूहाच्या अदानी विल्मार कंपनीने त्यांच्या फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत गहू मार्केटमध्ये एंन्ट्री केली आहे. या द्वारे त्यांनी दिल्लीपासून सुरतपर्यंत घरपोच गहू पोहोचवण्याची योजना तयार केली आहे.
कंपनी आता फॉर्च्युन ब्रँडच्या नावाने गहू बाजारात विकणार असल्याचे जाहीर केले आहे. अदानी समूहाच्या एफएमसी कंपनीने सांगितले की ते देशातील लोकांना शरबती, पूर्णा 1544, लोकवान आणि एमपी ग्रेड 1 सारख्या गव्हाच्या प्रीमियम ब्रँडची विक्री केली जाईल. याबाबत घोषणा करताना अदानी विल्मर कंपनीने सांगितले की, कंपनी फॉर्च्युन ब्रँडच्या नावाखाली गव्हाच्या विविध जाती विकणार आहे.
सुरुवातीला दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये विकले जातील. कंपनीचा दावा आहे की अदानी विल्मार ही देशातील एकमेव राष्ट्रीय स्तरावरील कंपनी असेल जी संपूर्ण गहू विकण्याच्या श्रेणीत प्रवेश करणार आहे. या उत्पादनाच्या लाँचप्रसंगी बोलताना, विनित विश्वंभरन म्हणाले, “देशात सध्या बाजारात भेसळविरहित चांगल्या दर्जाच्या गव्हाची नितांत गरज आहे. आणि अदानी विल्मर देशभरातील ग्राहकांना उत्तम दर्जाचा गहू उपलब्ध करून देईल.”
अदानी विल्मारने फॉर्च्यून ब्रँडच्या नावाखाली गहू लॉन्च करण्याबाबतची माहिती नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजशी शेअर केली आहे. या बातमीनंतर अदानी विल्मारचा शेअर 0.30 टक्क्यांनी घसरला असून तो 450.70 रुपयांवर व्यवहार करत होता.
फॉर्च्यून ब्रँड प्रामुख्याने खाद्यतेल उत्पादनांच्या श्रेणीसाठी ओळखला जात होता. तेलांव्यतिरिक्त, ब्रँडने गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यांसारखी उत्पादने देखील वितरित केली आहेत.
आज देशात ब्रँडेड अन्नधान्याच्या या श्रेणींमध्ये कोणताही ब्रँड नाही. Adani Wilmar Limited ही अहमदाबाद-मुख्यालय असलेली FMCG कंपनी आहे.
या कंपनीने वर्ष 2022 मध्ये एकूण महसुलात 45 टक्के वाढ झाली होती. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 2022 मध्ये अदानी विल्मार लिमिटेडने IPO द्वारे ₹ 3600 कोटी उभारले होते.
SL/KA/SL
27 May 2023