अदानी करणार अंतराळ संशोधन क्षेत्रात पदार्पण

 अदानी करणार अंतराळ संशोधन क्षेत्रात पदार्पण

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांत उद्योग विस्तार करणारे गौतम अदानी यांचा उद्योग समूह लवकरच अंतराळ क्षेत्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने छोट्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी किफायतशीर किमतीत यानाची निर्मिती करण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी निवडलेल्या तीन कंपन्यांमध्ये अदानी समूहाचा समावेश आहे.

ISRO ने 500 ग्रॅम वजनापर्यंतचे छोटे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) स्थापित करण्यासाठी एसएसएलव्ही हे प्रक्षेपक यान विकसित केले आहे. या छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपक यानांना जगभरातून सर्वाधिक मागणी आहे. इस्त्रोने एसएसएलव्हीची 2023 मध्ये यशस्वी चाचणी केली. त्यानंतर अवकाश क्षेत्रातील आपला आवाका वाढविण्याच्या उद्देशाने इस्त्रोने एसएसएलव्हीचे तंत्रज्ञान खासगी कंपन्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी ISRO ने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये 20 कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी तीन कंपन्यांची नावे अंतिम निर्णयासाठी निश्चित करण्यात आली आहेत. त्यात अदानी समूहातील एक कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांचा समावेश आहे.

SL/ML/SL15 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *