Adani-electricity गणेशोत्सव मंडपामध्ये देणार मोफत वीज

 Adani-electricity गणेशोत्सव मंडपामध्ये देणार मोफत वीज

मुंबई, दि. २३ : अदानी इलेक्ट्रिसिटीने गणेशोत्सव मंडपामध्ये निवासी दरात तात्पुरत्या वीज जोडण्या देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे साऱ्या मुंबई शहरात गणेशोत्सवादरम्यान गणेशोत्सव मंडळांना सातत्यपूर्ण वीज पुरवठा मिळेल. यासाठी गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांना तात्पुरती वीज जोडणी मिळेल. यासाठी गणेशोत्सव मंडळांना अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वेबसाईटवर जाऊन न्यू कनेक्शन विभागात तात्पुरत्या वीज जोडणीसाठी अर्ज करता येईल.

गणेशोत्सव मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात सातत्यपूर्ण आणि खात्रीशीर वीज पुरवठा देऊन आम्ही या उत्सवातील उत्साह आणखीन वाढवण्याची खात्री देत आहोत. ग्राहकांची अथक आणि चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचा आमचा निर्धारच यातून दिसून येत आहे, असे अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले.

गेल्या वर्षी आम्ही शहरातील 986 गणेशोत्सव मंडपांना अखंड वीजपुरवठा दिला होता. या उत्सवादरम्यान देखील आम्ही मंडपांना तात्काळ तात्पुरती वीज जोडणी देण्यासाठी आणि त्यांना सातत्यपूर्ण अखंड वीज पुरवठा करण्याची पूर्ण तयारी केली आहे. तसेच याबाबत कोणतीही समस्या आल्यास ती सोडवण्यासाठी आमची शीघ्र प्रतिसाद पथके शहरात मोक्याच्या जागी तैनात करण्यात आली आहेत, असेही प्रवक्त्याने सांगितले.

Adani-electricity will provide free electricity in Ganeshotsav mandapams

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *