Open AI विरोधात अदानी-अंबानी गेले कोर्टात

 Open AI विरोधात अदानी-अंबानी गेले कोर्टात

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दैनंदिन कामात सहज माहिती उपलब्ध करून देणारे Open AI आता वादात अडकले आहे. प्रख्यात उद्योगपती अदानी आणि अंबानी यांनी Open AI विरोधात केस दाखल केली आहे. इंडियन एक्स्प्रेस आणि हिंदुस्तान टाइम्ससह मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी दिल्ली न्यायालयात OpenAl विरुद्ध खटला दाखल केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॉपीराइट उल्लंघनाच्या आरोपाखाली हा खटला दाखल करण्यात आला आहे. OpenAl ने परवानगीशिवाय न्यूज वेबसाइटवरील कॉन्टेन्ट स्क्रैप केला आणि चॅटजीपीटीमध्ये वापरला. OpenAl वरभारतीय डिजिटल मीडियाचा कॉन्टेन्ट परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप आहे.

जर न्यायालयाचा निर्णय या माध्यम संस्थांच्या बाजूने आला, तर कॉपीराइट केलेल्या कॉन्टेन्टच्या वापराबाबत AI कंपन्यांवर कठोर नियम लादले जाऊ शकतात. जर निर्णय OpenAI च्या बाजूने आला तर Aाला डिजिटल युगात नवीन रूप मिळू शकते, ज्यामुळे कॉपीराइटचे नियम बदलू शकतात.

ANI ने दाखल केलेल्या खटल्याला उत्तर देताना, OpenAI ने असा युक्तिवाद केला आहे की, त्याचे भारतात कोणतेही कार्यालय नाही. तसेच, OpenAI ने सांगितले की ते सध्या US मध्ये चालू असलेल्या खटल्याचा सामना करत आहे, ज्यामुळे न्यायालयाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत सर्व डेटा सुरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. याचा अर्थ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणताही डेटा काढता येणार नाही.

SL/ML/SL27 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *