बाळाच्या रंगावरून ट्रोलिंग झाल्याने अभिनेत्रीची सायबर क्राइम विभागाकडे धाव

 बाळाच्या रंगावरून ट्रोलिंग झाल्याने अभिनेत्रीची सायबर क्राइम विभागाकडे धाव

मुंबई, दि. 4 : मनोरंजन विश्वातील कलाकारांना सोशल मिडियावर ट्रोलिंग होणे हे काही आता नवीन राहीलेले नाही. अनेकदा सेलिब्रिटी या टिकेकडे दुर्लक्ष करतात. मात्र आता नुकत्याच आई झालेल्या अभिनेत्रीला तिच्या बाळाला रंगावरुन ट्रोल झाल्याने तिने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सध्या सोशल मीडियावर एका गंभीर मुद्द्यावरून चर्चेत आहे. याआधी आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. तर, आता तिच्या अवघ्या ७ महिन्यांच्या बाळालाही नेटकऱ्यांनी लक्ष्य केलंय. देवोलीनाने सायबर क्राइम विभागाकडे धाव घेतली आहे. तिने ट्रोलर्स विरोधात तक्रार दाखल केली असून ‘यापुढे तिच्या मुलावर जे कोणी टीका करतील, त्यांना तुरुंगाची हवा खायला लागेल,’ असा इशारा देखील तिने यावेळी दिला आहे.

अलिकडेच देवोलीनाचा मुलगा ‘जॉय’ हा ७ महिन्यांचा झाला. त्या निमित्ताने तिने सेलिब्रेशन केले होते. या प्रसंगाचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यातून पहिल्यांदाच तिच्या बाळाचा चेहरा जगासमोर आला. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाने शुभेच्छा दिल्या, तर काहींनी बाळाच्या रंगावरून त्याला ट्रोल करत, विखारी प्रतिक्रिया दिल्या. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या देवोलीनाने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

तिने यापुढे तिच्या मुलाला ट्रोल करणाऱ्यांना सक्त ताकीद देत म्हंटलं, की “मी सेलिब्रिटी आहे म्हणून माझ्यावर टीका झाली, तर मी सहन करते. कारण मला माहिती होतं प्रेमासोबत मला द्वेषही मिळेल. म्हणून मी गप्प होते. त्यानंतर मी आंतरधर्मीय विवाह केल्याने माझ्या लग्नावर वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले, मी तरीही लक्ष नाही दिलं. पण, माझ्या मुलावर टिका करणं चुकीचं आहे. यावर मी शांत राहणार नाही आणि हे फक्त माझ्या मुलासाठीच नाही, तर अशा वागणुकीविरोधात उभं राहण्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे.”

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *