अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग, पोस्ट शेअर करत दिली माहिती

ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानला(३६) स्तनांचा कर्करोग झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरल्या होत्या. तिला गंभीर आजाराची लागण झाल्याचंही बोललं जात होतं. अखेर तिनेच इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. हिनाला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला आहे.
तिने पोस्ट शेअऱ करताना लिहिलंय की, “मी या आजारावर मात करण्यासाठी तयार आहे. माझे उपचार सुरू झाले आहेत आणि यातून बरी होण्यासाठी मी सर्व प्रयत्न करण्यासाठी तयार आहे. या कठीण काळात माझ्या प्रायव्हसीचा आदर करा. तुम्ही कठीण प्रवासात तुमचा पाठिंबा, सल्ले आणि अनुभव तुम्ही शेअर करू शकता.” तसेच या कठीण काळात तिचं कुटुंबिय तिच्यासोबत असल्याचंही तिने सांगितलं. दरम्यान, एप्रिलमध्ये हिनाने सोशल मीडियावर तिला गंभीर आरोग्य समस्या असल्याचं सांगितलं होतं.
ML/ML/SL
28 June 2024