दिग्गज अभिनेत्री मीना गणेश काळाच्या पडद्याआड; रंगभूमी अन् सिनेमाविश्वातील तारा निखळला
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जेष्ठ अभिनेत्री मीना गणेश यांचे दुःखद निधन झाले आहे. रंगभूमी आणि सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या मीनाताईंनी अनेक रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या अभिनयाने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत वेगळाच मानाचा तुरा रोवला होता. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मीना गणेश यांनी आपल्या कारकिर्दीतून विविध चिरस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भावनिक अनुभव दिला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीला आणि सिनेसृष्टीला मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृती कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहतील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
ML/ML/PGB 19 Dec 2024