महाभारत मालिकेमध्ये कर्णाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे निधन

मुंबई, दि. १५ : बी.आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय टीव्ही शो महाभारत मालिकेमध्ये कर्णाची अप्रतिम भूमिका साकारणारे अभिनेते अभिनेता पंकज धीर यांचे आज निधन झाले. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंजत होते. पंकज धीर यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या कामाची छाप सोडली आहे. ते चंद्रकांता, युग, द ग्रेट मराठा आणि बढ़ो बहू या सारख्या प्रसिदध मालिकांमध्ये दिसले. त्यांनी आशिक आवारा, सडक, सोल्जर आणि बादशाह सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
१९८३ मध्ये त्यांनी पहिला भारतीय अश्लील सिनेमा “बॉम्बे फॅन्टसी” प्रदर्शित केला तेव्हा बरीच खळबळ देखील उडाली होती. ‘बॉम्बे फॅन्टसी’चं दिग्दर्शन पंकज धीर यांनी केल होतं, तर प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक मजहर खान यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती.
अभिनेता पंकज धीर यांच्यावर आज मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती आहे. त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र, तसेच इंडस्ट्रीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जात आहेत.
SL/ML/SL 15 Oct. 2025